नागपूर : अजनी स्थानकाचा सॅटेलाइट रेल्वे स्टेशन म्हणून विकास करण्याच्या कामासाठी यावेळी ८ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अर्थ आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात अजनीत सॅटेलाईट टर्मिनल साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भविष्यात अनेक गाड्यांचा थांबा अजनी स्थानकावर राहील आणि नागपूर स्थानकावरील प्रवाशांचा भार काही प्रमाणात कमी होऊ शकेल.
सध्या नागपूर स्थानकावरून रोज १२५ गाड्या जातात. जवळपास ३० ते ४० हजार प्रवाशांची रोज ये-जा असते. खरं म्हणजे नागपूरला लागूनच अजनी स्थानक आहे. मात्र ते पूर्ण विकसित नसल्याने त्याच पूर्ण उपयोग होत नाही. त्यामुळेच अजनीचा सॅटेलाइट स्टेशन म्हणून विकास करण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी झाली होती. मुख्य स्थानकावरील भार कमी करण्यासाठी जवळच्या स्थानकाचा सॅटेलाइट स्टेशन म्हणून विकास केला जातो. आता या कामासाठी ८ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
अधिक वाचा : नागपुरात नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन