भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन: कोकणातलं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणणार

BJP manifesto

मुंबईः राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या रणधुमाळीमध्येच भाजपनं आज निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं. निवडणुकीच्या या सर्व घडामोडींवर एक नजर…

भाजपच्या संकल्पपत्रातील ठळक मुद्दे:

>> मुंबईः महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान व्हावा यासाठी प्रयत्न करणार

>> मुंबई लोकल रेल्वे वाहतूकीचा प्रवास सुकर होण्यासाठी विविध प्रकल्प राबवणार

>> राज्यातील रस्त्यांची कायमस्वरूपी देभभाल दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार

>> कचऱ्यापासून वीज निर्मिती; भाजपच्या संकल्पपत्रात घोषणा

>> शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा पुरवणार

>> पाच वर्षात आयआयटी, आयआयएम आणि एम्स सारख्या नव्या संस्था उभारणार

>> पाचवीपासून पाठ्यपुस्तकात शेतीवर आधारीत अभ्यासक्रम लागू करणार
>> महाराष्ट्रातील विविध शहरांत पाच आयटी पार्क उभारणार

>> मुंबईः २०२२ पर्यंत शुद्ध पाणी संपूर्ण महाराष्टात पोहचवणार

>> शाश्वत शेतीसाठी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार

>> २०२२ पर्यंत सर्वांना शुद्ध पाणी देणार

>> सर्व प्रकारच्या कामगारांची नोंदणी करून त्यांना सामाजिक सुरक्षा देणार, भाजपचा संकल्प

>> संपूर्ण महाराष्ट्र इंटरनेटने जोडणार

>> येत्या पाच वर्षांत १ कोटी रोजगार निर्माण करणार

>> भ्रष्टाचारयुक्त ते भ्रष्टाचारमुक्त असा महाराष्ट्राचा प्रवास – नड्डा

>> फडणवीसांमुळं राज्यातील राजकीय संस्कृती बदलली – नड्डा

>> कोकणातलं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणणार – फडणवीस
>> दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे भाजपचं लक्ष्य, संकल्पपत्रात रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांवर भर – फडणवीस

>> भविष्यातील आव्हानांचा विचार करून भाजपनं संकल्पपत्र तयार केलंय – मुख्यमंत्री फडणवीस
>> विरोधकांकडे विरोधासाठी नेताही नाही – पाटील

>> शिवस्मारक, डॉ. आंबेडकर स्मारक पूर्ण करणार – चंद्रकांत पाटील

>> भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन

>> भाजपच्या प्रचारगीतात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व रामदास आठवले यांनाही स्थान

>> ‘पुन्हा आणूया आपले सरकार…’ या प्रचारगीतानं कार्यक्रमाला सुरुवात

>> रामराव वडकते यांचा भाजपमध्ये प्रवेश

>> मुंबई: भाजपच्या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याला सुरुवात