Big News! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

big-news-former-japanese-prime-minister-shinzo-abe-dies
big-news-former-japanese-prime-minister-shinzo-abe-dies

नारा (जपान) : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात हल्ला झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे वृत्त जपानमधील NHK WORLD News ने दिले आहे. शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. शिंजो आबे हे पश्चिम जपानमधील नारा शहरातील एका प्रचारसभेत संबोधित करत होते. भाषण करत असताना ते अचानक खाली कोसळले. त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांच्या छातीत गोळी लागली होती. यामुळे ते गंभीर जखमी होते. बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी नारा शहरातील ४१ वर्षीय यामागामी तेत्सुयाला याला हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली आहे.

नारा शहरात लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी भाषण करत असताना शिंजो आबे हे अचानक खाली कोसळले. घटनास्थळी असलेल्या पत्रकारांनी त्यांना गोळी लागल्याचे म्हटले होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन एका संशयिताला अटक केली आहे. शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याचा जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

शिंजो आबे यांच्यावर ज्या ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या त्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने सांगितले की, बंदुकीच्या दुसऱ्या गोळीनंतर आबे खाली कोसळले. आबे भाषण करत असताना त्यांच्या पाठीमागून एक माणूस आला. पहिली गोळी झाडल्यानंतर आबे खाली कोसळले नाहीत. पण दुसऱ्या गोळी छातीवर लागताच आबे खाली कोसळल्याचे सदर महिलेने म्हटले आहे. संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न न करता तो जागेवरच थांबला. त्याने बंदूक खाली ठेवली. त्यानंतर त्यांनी लोकांनी पकडले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पण हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही