BHIM अॅप ऑफर : विमान प्रवासावर मिळणार ५ हजारांची सूट !

BHIM अॅप ऑफर : विमान प्रवासावर मिळणार ५ हजारांची सूट !

विमानाचं तिकीट बूक करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. BHIM अॅप द्वारे घरगुती विमान प्रवासाचं तिकीट बुक केल्यास तुम्हाला ५ हजार रुपयांची सूट मिळू शकते. इंडिगो आणि गोएअर कंपनीने २० लाख सीटसाठी सेल ऑफर सुरू केली आहे. याशिवाय स्पाइस जेटचे तिकीट बुक केल्यावरही तुम्हाला ५,००० रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. तसंच, स्पाइस जेटच्या वन वे ट्रिपवर ५०० रुपये आणि राउंड ट्रीपवर १००० रुपयांची सूट देखील तुम्ही मिळवू शकता. यासाठी तुम्हाला केवळ भीम अॅपद्वारे तिकीट बुक करावं लागेल.

या ऑफरचा लाभ कसा घ्यायचा 
– सर्वप्रथम तुम्ही https://www.thomascook.in या संकेतस्थळावर जा
– त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण आणि इतर आवश्यक सर्व माहिती टाका
– आता तुम्हाला BHIMUPI प्रोमो कोड पेमेंट करताना टाकावा लागेल.
– त्यानंतर ऑर्डर चेक आउट करा आणि भीम युपीआयच्या माध्यमातूनच पेमेंट करा
– लक्षात ठेवा ३१ डिसेंबरपर्यंत ही ऑफर आहे. पण, १ ते १० नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी ही ऑफर मिळणार नाही.

अधिक वाचा : IndiGo Airlines sale: IndiGo Offers Flight Tickets From Rs. 999 On 10 Lakh Seats