कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने बैरागीपुरा परिसर सील

Date:

नागपूर, ता. ११ : नागपूर महानगरपालिका हद्दीतील गांधी-महाल झोन अंतर्गत येणा-या बैरागीपुरा प्रभाग क्रमांक २२ येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होउ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

        या आदेशानुसार गांधी-महाल झोन क्रमांक ६ आणि सतरंजीपुरा झोन क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक २१ व २२च्या उत्तर-पूर्वेस ए.एम.ए. कंपनी मालधक्का रोड, दक्षिण-पूर्वेस उमिया शंकर शाळा, दक्षिण-पश्चीमेस मासुरकर चौक, उत्तर-पश्चीमेस होटल मदिना, पूर्वेस बोधीसत्व बौद्ध विहार, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

        शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related