रॉंग साईड जाण पढले महागात, कारच्या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू

रॉंग साईड जाण पढले महागात, कारच्या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू

औरंगाबाद: भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरुळ शिवारात झाली. ही घटना सोमवारी (ता.२२) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. साहेबसिंग मानसिंग गुसिंगे असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

साहेबसिंग मानसिंग गुसिंगे वय ५५ वर्षे, राहणार कौचलवाडी (ता.अंबड) हे सोमवारी (ता.२२) रोजी सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच २१ बीएल ६९५७ ने दाभरुळकडून रोहिलागड फाट्याकडे राँग साईडने जात होते नेमके त्यावेळी औरंगाबादकडून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक एमएच १८ एजे ४३९६ ने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. यात दुचाकीचा चुराडा होऊन दुचाकीस्वार साहेबसिंग गुसिंगे हे रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच बिट जमादार गोरक्षनाथ कनसे, अनिल पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली गोरक्षनाथ कनसे करीत आहेत.