नागपुर: घरात घुसून तरुणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला

Date:

नागपूर : लातूर येथे तरुणीची घरात घुसून हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच उपराजधानी नागपुरात असाच एक प्रकार घडला आहे. नागपूरमध्ये तुकडोजी नगर येथे भर दिवसा एका तरुणीवर घरात घुसून तलवारीने सपासप वार करण्यात आले. यात ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राणा प्रताप नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याचे नाव शुभम मरस्कोले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान पीडित तरुणी घरी असताना शुभम मरस्कोले हा तरुण तलवारीसारखं शस्त्र हातात घेऊन तिच्या घरात घुसला. आरोपीने तरुणीवर सपासप वार केले. यात तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणीच्या किंचाळण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केले. ही घटना घडल्याच्या काही तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तीन दिवसांपूर्वी लातूरध्येही अपूर्वा यादव या तरुणीची प्रियकराच्या मित्रानंच घरात घुसून हत्या केली होती. प्रेमात फसवणूक झाल्यानं प्रियकराला आत्महत्या करावी लागली होती म्हणून त्याच्या मित्रानं सुडाच्या भावनेनं अपूर्वाची हत्या केल्याचं उघड झालं. आता नागपूरमध्येही प्रेम प्रकरणातून हत्येचा प्रयत्न झाल्यामुळे राज्यात तरुणींवरील वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय.

अधिक वाचा : शहरातील रावण दहनाला नितीन गडकरी सह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...