नवी दिल्ली: जगभरात अधिकतर स्मार्टफोन (Smartphone) अँड्रॉईड सिस्टमवर (Android System) चालतात. त्यामुळे यात काही समस्या आल्यास, जगभरातील अँड्रॉईड युजर्सवर याचा परिणाम होतो. अँड्रॉईड अॅप्समध्ये (Android Apps) सुरक्षेच्यादृष्टीने सरासरी 39 समस्या आणि बग्स असल्याचं समोर आलं आहे. याचा फायदा हॅकर्सला होतो. युजर्सला आर्थिक, तसंच डेटा चोरी करुन नुकसान पोहोचवण्यासाठी हॅकर्सकडून या अॅप्सचा वापर करता येऊ शकतो, अशी बाब ZDNet द्वारा समोर आली आहे.
CyRC च्या एका रिपोर्टचा हवाला देत, ZDNet द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, 60 टक्क्यांहून अधिक अँड्रॉईड अॅप्समध्ये गडबड असून युजर्सला याबाबत कोणताही अंदाज नसतो, की त्यांच्यावर याचा किती परिणाम होऊ शकतो. CyRC ने गुगल प्ले स्टोरवरील (Google Play Store) 3335 फ्री आणि पेड मोबाईल अॅप्सला Analysed केलं आहे. हा रिपोर्ट AtlasVPN डेटावर बेस्ड आहे. म्हणजेच ज्या युजर्सने हे अॅप्स इन्स्टॉल केले आहे, त्यांच्यावर परिणाम होऊ शकतात.
फ्री अॅप्स कॅटेगरीमध्ये सर्वाधिक 96 टक्के समस्या असल्याचं समोर आलं आहे. तसंच गेमिंग कॅटेगरीमध्ये 94 टक्के समस्या आहे. बँकिंग आणि फायनेंशियल अॅप्समध्ये 88 टक्के, तर फिटनेस कॅटगरी अॅप्समध्ये 36 टक्के समस्या असल्याचं रिपोर्टनुसार सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, अनेक हॅकर्स गुगल प्ले स्टोरवर खऱ्या अॅपप्रमाणेच दिसणारे काही बनावट अॅप तयार करतात. हे Fake Apps खऱ्या अॅपप्रमाणेच दिसतात. त्यामुळे अनेकदा युजर्स ते बनावट अॅप्स डाउनलोड करतात. युजर्सने अॅप्स डाउनलोड करताना ते लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे. अॅपचा लोगो, डिझाईन, नावाचं स्पेलिंग तपासणं महत्त्वाचं ठरतं.