जियोचे जबरदस्त प्लॅन्स! डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग; किंमत 300 रुपयांच्या आत

Reliance Jio

टेलिकॉम दिग्गज जियो ग्राहकांसाठी सतत नवनवीन प्लॅन्स घेऊन येत असते. परंतु त्या प्लॅन्समधून योग्य त्या प्लॅनची निवड करणे सहज शक्य होत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी Reliance Jio च्या अश्या प्लॅन्सची यादी घेऊन आलो आहोत ज्यांची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. हे प्लॅन्स जास्त डेटा आणि मोफत कॉलिंग देतात.

149 रुपयांचा प्लॅन  

Jio प्रीपेड युजर्ससाठी कंपनीने 149 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे, या प्लॅनची वैधता 24 दिवस आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, रोज 1GB डेटा आणि प्रतिदिन 100 SMS असे फायदे मिळतात. त्याचबरोबर JioTV, JioCinema, JioNews आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देखील या प्लॅनमध्ये देण्यात आला आहे.

199 रुपयांचा प्लॅन 

यह एक मासिक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. या रिचार्जमध्ये ग्राहकांना रोज 1.5GB डेटा दिला जातो. त्याचबरोबर अनलिमिटेड व्हॉइस कॉल, प्रतिदिन 100 एसएमएस देखील मिळतात. हा प्लॅन घेणारे ग्राहक मोफत JioTV, JioNews, JioCinema आणि इतर जियो अ‍ॅप्सचा आनंद घेऊ शकतात. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

249 रुपयांचा प्लॅन  

हा जियोचा 300 रुपयांच्या आत येणारा शेवटचा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना प्रतिदिन डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि रोज 100 एसएमएस दिले जातात. तसेच या प्लॅनमध्ये देखील JioTV, JioNews, JioCinema आणि इतर जियोअ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.