अंकिता लोखंडे लवकरच बोहल्यावर ?

नागपूर : अभिनेता सुशांतसिंग राजपूतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताचे सूर कुणाशी जुळणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. तर, बातमी अशी आहे की अंकिताच्या आयुष्यात नव्या जोडीदाराची एंट्री झाली आहे.

बिझनेसमन विक्की जैनसोबत सध्या ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळतंय. दोघांचा एक व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजतं.

अंकिताला मराठी पद्धतीनं अगदी साधंसुधं लग्न करायचं आहे. त्यांचा लग्नसोहळा कधी रंगणार याची आता उत्सुकता असेल.

अधिक वाचा : Gajbhiye demands repoll at 384 Umrer segments