महिलेने दारू पिऊन घातला भर चौकात धिंगाणा, पोलिसांनी घडवली अद्दल

Date:

अमरावती : परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात लेखापाल पदावर कार्यरत असणाऱ्या महिलेने अंमली पदार्थाचे सेवन करुन भर चौकात धिंगाणा घातला होता. अचलपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यांची नोंद करत त्या महिलेला सुपूर्द नाम्यावर पतीच्या स्वाधीन केलं. सदर महिलेला धडा शिक्षविण्यासाठी उपवन संरक्षक चंद्रसेखरन बाला यांनी या महिला लेखापालाला निलंबित करत तिची मोर्शी वनपरिक्षेत्र कार्यालयात बदली करण्याचे आदेश दिले आहेत.w

परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयातील लेखा विभागात कार्यरत असणाऱ्या या महिलेने अंमली पदार्थाचे सेवन करुन चांगलाच धिंगाणा घातला होता. दरम्यान सदर महिलेने वनविभागातील कर्मचारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर हात उचलत शिवीगाळ केली होती.

इतकंच नाहीतर या महिलेला आरोग्य तपासणीसाठी नेलं असता तिने अचलपूर पोलीस स्टेशनमधील महिला पीएसआयसोबत वाद घालून त्यांनाही नखाने ओरबाडत जखमी केले. या महिलेचे असभ्य वर्तन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे तीन तास म्हणजेच दुपारी २ पासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते.

नशेत असलेल्या या लेखापाल महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर महिलेला सुपूर्द नाम्यावर पतीच्या स्वाधीन केले. या महिलेच्या वर्तवणुकीच्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. उपवनसरंक्षक चंद्रसेखरन बाला यांनी बुधवारी महाराष्ट्र नागरहक सेवा शिस्त व अपील नियमान्वये तत्काळ या महिला लेखापालास निलंबित करीत या कालावधीत मोर्शी वनपरिक्षेत्र अधिकारी येथे मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...

Happy Baisakhi 2024: Date Significance,Top Wishes & Greetings, More…

Let's look at the Baisakhi Festival 2024. You might...