नागपूर : कथ्थक, भरतनाट्यम, लोकनृत्य, सीनेनृत्य अशा विविध नृत्य प्रकार एकाच मंचावर सादर करीत देशभरातून आलेल्या नृत्य कलावंतांनी रसिकांना रिझविले. नागपूर महानगरपालिका आणि कलाशृंगार नृत्य निकेतनच्या वतीने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ९ आणि १० फेब्रुवारी रोजी आयोजित अखिल भारतीय नृत्य स्पर्धेचा समारोप थाटात पार पडला.
नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर नृत्य गुरु सोनू नक्षिणे, प्रमोद कळमकर, मंगेश वाघमारे, नंदकिशोर मोटघरे, दिनेश बांते, प्रदीप वाडीभस्मे, दिनेश गुप्ता, वैभव शिंपी, रामानंद नन्नावारे, साहेबराव धुर्वे, चंद्रशेखर राऊत, कल्पना अणेराव, मनिषा झाडे, पूजा निनावे, नंदिनी कळमकर, जयश्री कोहळे, वर्षा मोटघरे, विना बांते, स्नेहल वाघमारे, योगेश्री पटले, विनिता भुसारी, कविता भोसले उपस्थित होते.
सतत दोन दिवस आलेल्या स्पर्धेत विविध राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. विविध गटातील विजेत्यांना यावेळी पारितोषिक प्रदान करण्यात आले. विजेत्यांमध्ये भरतनाट्यम (एकल-वयोगट ५ ते १०) आदिती भुडे, ऐश्वर्या सेठिया, पलक डोये, वयोगट १० ते १५ मध्ये अक्षदा अय्यर, आर्या कळमकर, दिया अग्रवाल, १५ वर्षावरील गटात अंतरा पेडुलवार, अर्जुन नायर, आनंद पटेल, भरतनाट्यम युगुल (१५ वर्षाखालील) अंबिका ठाकूर-श्रेया रस्तोगी, रागिनी भगत-पलक वासनिक, आणि समूह भरतनाट्यममध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्सचा संघ विजयी ठरला.
कथ्थक (एकल-वयोगट ५ ते १०) अनन्या पंडित, वयोगट १० ते १५ मध्ये कीर्ति भिसीकर, शाश्वती चहांदे, राशी पहारे, १५ वर्षावरील वयोगटात नमिता राऊत, युगुल नृत्यात १५ वर्षाखालील गटात चिन्मय भिसीकर-त्रिसा सारडा, १५ वर्षावरील गटात नमिता राऊत-अवंती दुधात तर समूह नृत्यात त्रिविधा कथ्थक कला निकेतन तर १५ वर्षावरील गटात शील कलासागरची चमू विजयी ठरली .
सेमी क्लासिकलमध्ये ५ ते १० वयोगटात राजेश्वरी कोंडावार, १० ते १५ वयोगटात शर्वरी जुनघरे, १५ वर्षावरील वयोगटात अंतरा पेडुलवार, युगुलमध्ये देवयानी सुतार-प्राची पाणीग्रही (ओरिसा), समूह नृत्य १५ वर्षाखालील गटात विवेकानंद पब्लिक स्कूल तर १५ वर्षावरील गटात नाट्यछंदची चमू विजयी ठरली.
लोकनृत्यात ५ ते १० वर्षे वयोगटात प्रेषिता चव्हाण, १० ते १५ वर्षे वयोगटात इसप्रित कौर, १५ वर्षावरील वयोगटात मृणालिनी दांडेकर, युगुल नृत्यात समृद्धी कंजारे-अद्विता नाईके, १५ वर्षावरील गटात नेहा बांगडे-दीपा उके, समूह नृत्य १५ वर्षाखालील गटात स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी विजेता ठरले. सीनेनृत्य स्पर्धेत एकल ५ ते १० वर्षे वयोगटात प्रत्युश पाटील, १० ते १५ वर्षे वयोगटात उन्नती आष्टनकर, जान्हवी सोमकुंवर, १५ वर्षावरील वयोगटात अर्जुन नायर, श्लोक पोहनकर, युगुल स्पर्धेत १५ वर्षाखालील गटात गौरव बावनखरे-आनंदी अंबार्ते, १५ वर्षावरील गटात हर्षल मुंडले-श्रुती पाठक, समूह नृत्यात १५ वर्षाखालील गटात एनएसएस ग्रुप तर १५ वर्षावरील गटात फूटवर्क डान्स अकादमी विजयी ठरले.
‘थीम डान्स’मध्ये एफडीएने मारली बाजी
नृत्य स्पर्धेत आई फाऊंडेशनच्या वतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या थीमवर आधारीत नृत्य स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये फूटवर्क डान्स अकादमीने बाजी मारली. त्यापाठोपाठ इरा इंटरनॅशनल स्कूल आणि नटराज एसओएस ग्रुप अकोलाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. आई फाऊंडेशनच्या वतीने यातील विजेत्यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था निवासी मूकबधीर विद्यालयाची विद्यार्थिनी देवयानी शेंद्रे, कल्याणी बागडे, खुशी डवले यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन अपर्णा लखमापुरे आणि कविता भोसले यांनी केले.
अधिक वाचा : पलक अग्रवाल ने दी अरंगेत्रम की प्रस्तुति