फुटाळ्यावर क्षुल्लक कारणावरून तरुणींमध्ये हाणामारी

नागपूर

नागपूर : एकमेकांना बघून हसण्याच्या कारणावरून फुटाळा तलाव चौपाटीवर २ तरुण-तरुणींच्या ग्रुपमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीमुळे चौपटी परिसरातील लोकांचे मात्र, चांगलेच मनोरंजन झालेले पाहायला मिळाले.

युथ डेस्टिनेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटाळा तलाव चौपाटीवर ७ फेब्रुवारीला तरुण-तरुणींचा एक ग्रुप बसला होता. यावेळी तिथे दुसरा ग्रुप आला. दुसऱ्या ग्रुपची लोक आपल्याकडे बघून हसत आहेत. या कारणावरून २ तरुणींमध्ये वाद झाला. वादामुळे तरुणींमध्ये भर चौपाटीवर हाणामारी सुरू झाली. यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणी कोणचेच काही ऐकत नव्हत्या. तरुणी एकमेकांना अर्वाच्य आणि अश्लील शिवीगाळ करत होत्या. यामुळे प्रत्यक्षदर्शींनी पोलीस कंट्रोल रूमला या बद्दल माहिती दिली आणि अंबाझरी पोलिसांनी येऊन हा वाद मिटविला.

अंबाझरी पोलिसांनी मारहाणीचे घटनास्थळ गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्याने तरुण-तरुणींना गिट्टीखदान पोलिसांच्या सुपूर्द केले. चौकशीत दोन्ही गटांची ओळख पटल्यानंतर घटनेत सहभागी असलेल्या तरुण-तरुणींना पालकांसह पोलीस स्टेशनमध्ये बोलावून समज देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हाची नोंद केली आहे.

अधिक वाचा : प्रेयसीच्या साक्षगंधात प्रियकराचा धिंगाणा

Comments

comments