गडचिरोलीकडे जाणारा मद्यसाठा पकडला

नागपूर : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात मद्याची विक्री होत असल्याचे आणखी पुढे आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गडचिरोली ला जाणारे विदेशी मद्य व वाहन असा रुपये १० लाख ३३ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सक्करदरा पोलिस स्थानक परिसरात अशा स्वरूपाचा मद्यसाठा गडचिरोलीला जात असल्याची माहिती मिळाली. वाहनाची तपासणी घेतली असता हा मद्यसाठा आढळून आला. ‘इम्पिरियल ब्लू‘ १८० मिली विदेशी मद्याचे पाच बॉक्स आढळून आले. पोलिस पुढील तपास करीत आहे. कारवाई विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशानुसार व निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक यांनी केली.