नागपुरातील कार्यकर्तेही झालेत ‘चौकीदार’

नागपूर : ‘मै भी चौकीदार’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी रविवारी संवाद साधला. नागपुरातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झालेत. यावेळी सर्वांनी ‘मै भी चौकीदार’चा नारा दिला.

कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही हा कार्यक्रम बघण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, राजेश बागडी, संदीप जोशी, भोजराज डुंबे, देवेन दस्तुरे, रमेश चोपडे, जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी ‘मै भी चौकीदार’चा नारा दिला.

अधिक वाचा : वर्धा में १ अप्रैल को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की रैली