रेल्वेमधून दारू तस्करी करणाऱ्या आरोपीला नागपुरात अटक

Date:

नागपूर : आरपीएफ स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमने दारू तस्करी करणाऱ्या आरोपीस सिनेस्टाईल पाठलाग करत अटक केली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

रोशन ढेंनगले (वय ३४) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची चौकशी केली असता नागपूरवरून दारूची तस्करी करत असल्याची कबुली त्याने दिली. आरपीएफच्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीम आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे.

फलाट क्रमांक २ वर असलेल्या गाडी क्रमांक १२७२२ दक्षिण एक्सप्रेसमधील कोच ८ मध्ये संशयित बॅग स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमला आढळून आली. याप्रकरणी उपनिरीक्षण विकास शर्मा यांनी विचारणा केली असता आरोपीने दारूची बॅग उपनिरीक्षक विकास शर्मावर फेकली आणि तिथून पळ काढला. मात्र, गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी सिनेस्टाईलने आरोपीचा पाठलाग करून आरोपीला पकडले. याप्रकरणी बॅगमधून २३ दारूच्या बाटल्या आरपीएफ जवानांनी जप्त केल्या आहेत.

अधिक वाचा : दगड खाणीत ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related