यवतमाळ मध्ये आरोपीने केलेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील एका जमादाराला आरोपीने लाकडी दांड्याने तोंडावर मारून जागीच ठार केलं तर इतर दोन पोलीस अधिकारीदेखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
राजेंद्र कुलमेथे असं मृत्यू झालेल्या पोलीस जमादाराचं नाव आहे. मारेगावच्या हिवरी येथील ही धक्कादायक घटना आहे. अनिल मिश्रा असं आरोपीचं नाव आहे. त्याविरोधात अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्यामुळे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची टीम आरोपीच्या घरी गेली होती.
पोलिसांनी आरोपीला बाहेर येण्यास सांगितलं. पण मी बाहेर येणार नाही तुम्हाला जे करायचं आहे ते करा अशी दादागिरी आरोपीने केली. त्यानंतर काही घडताच त्याने दरवाजा उघडला आणि पोलीस पथकावर हल्ला केला.
हा हल्ल्यात आरोपी अनिल मित्राच्या आईचादेखील हात होता. या दोघांनी 3 पोलिसांवर हल्ला केला. दोघांनी लाकडी दांडक्याने 3 पोलिसांवर हल्ला केला. यात 3 पोलीस गंभीर जखमी झाले. पण उपचारादरम्यान पोलीस जमादार राजेंद्र कुलमेथे यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर जखमी पोलिसांचा नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, आरोपी अनिल आणि त्याच्या आईवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. तर घटनास्थळावरून पोलिसांवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेलं लाकडी दांडकंदेखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे.
अधिक वाचा : मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस