नांदेड-नागपूर महामार्गावर भिषण अपघात, 25 हून अधिक जखमी

Date:

नागपूर : नागपूर महामार्गावर सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. यात बस मधील 25 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे. यात बस चालक गंभीर जखमी झाला असून सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नांदेड- नागपूर महामार्गावर सांगवी आसना पुलाजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगातील ट्रक नांदेड मार्गे जात असताना नांदेडहून येणाऱ्या नांदेड पुसद बसला या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे बस रोडसोडून खाली गेली. अपघातात 25 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे. गाडीमध्ये प्रवास करणारे बरेच प्रवासी हे शासकीय नोकरीसाठी जात असल्याचे कळते.

अपघातामुळे गाडी मधील सीट अक्षरशः तुटून पडल्या आहेत, अनेकांच्या डोक्याला मार लागला आहे. बसचालक गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड, वैद्य, साळुंखे यांच्यासह अर्धापूर पोलीस व महामार्ग पोलीस यांनी तातडीने भेट देऊन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटना घडताच ट्रक चालक मात्र फरार झाला.

अधिक वाचा : मेट्रोच्या ट्रेलरने कामगारांना चिरडले

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related