पुनरपरिक्षेचे निकाल जाहीर न झाल्याने संतप्त एबीव्हीपी कार्यकर्त्यांची विद्यापीठामध्ये तोडफोड

नागपुर

नागपुर : नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये शुक्रवारी ८ फेब्रुवारी ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी विद्यापीठामध्ये जबरन प्रवेश करुण तोडफोड केली. माहिती च्या अनुसार मागील अनेक दिवसांपासून पुनरपरिक्षेचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे संतापून कार्यकर्त्यांनी हा पवित्रा घेतला असे सांगितले जात आहे. या प्रकरणात विद्यापीठातील एका सुरक्षा रक्षकालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे.

नागपूर विद्यापीठाच्या पुनरपरिक्षांचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संतापले आहेत. त्यानंतर शुक्रवारी अभाविपच्या विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरामध्ये तणावपूर्ण वातारण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांनी तोडफोड करताना कुलगुरू आणि प्रकुलगुरू यांचे कार्यालयातही गोंधळ घातला. तेथील कार्यालयाच्या काचा आणि इतर काही वास्तु त्यांनी फोडल्या असून एका सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. त्यांनी सुरक्षा रक्षकाला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

अधिक वाचा : कोळसाामाफिया शेख हाजीचा आणखी एक साथीदार अटकेत

Comments

comments