चाँद मुबारक, आजपासून ‘रमजान’चे उपवास सुरू

नागपूर : देशभरात अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाल्यामुळे आज मंगळवारपासून ‘रमजान’ हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना सुरू होत आहे. आज चाँद दिसल्यामुळे मुस्लीम बांधवांच्या उपवासांना उद्यापासून सुरुवात होत आहे. ५ मे रोजी चंद्रदर्शन झालं नव्हतं. त्यामुळे लखनऊच्या मकरजी चांद कमिटीने ७ मेपासून रमजान सुरू होणार असल्याची घोषणा केली होती.

इस्लामिक दिनदर्शिकेनुसार मुस्लिम बांधव नवव्या महिन्यात २९-३० दिवसाचा रोजा ठेवतात. त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फितर म्हणजे ईद साजरी केली जाते. ईदसुद्धा चंद्रदर्शनानेच साजरी केली जाते.

मोदींकडून शुभेच्छा

पवित्र रमजान महिना सुरू होत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा. या पवित्र महिन्यात आपल्या समाजात सौहार्द, आनंद आणि बंधुत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी हीच सदिच्छा,’ अशा शब्दांत मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

रमजान म्हणजे काय ?

जगभरातील मुस्लीम बांधवांसाठी रमजान हा सर्वात पवित्र महिना आहे. रमजान हा इस्लामी दिनदर्शिकेतील नववा महिना आहे. ही दिनदर्शिका चंद्राच्या कलांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. जेव्हा हजरत मुहम्मद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले, तेव्हा पासून म्हणजेच इसवी सन पूर्व ६२२ मध्ये हिजरी दिनदर्शिकेची सुरुवात झाली.

रमजानची वैशिष्ट्ये :

>> रमजान महिन्यात दिवसाला ५ नव्हे तर ६ वेळा नमाज होते

>> जगातील ५७ मुस्लिम देशांत रमजान साजरा केला जातो

>> रमजानमध्ये कमीत कमी २९ दिवस रोजा ठेवतात, परंतु ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस रोजा ठेवत नाहीत

>> वयाच्या १२ व्या वर्षांपासून रोजा ठेवावा लागतो

>> रोजा न ठेवल्यास एक दिवसाचं अन्न दान करावं लागतं

अधिक वाचा : वर्ल्डकप : भारत -पाक सामना अवघ्या दोन दिवसांत ‘हाऊसफुल्ल’