नागपुर : शहररात काल पासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळालेला आहे, पण सतत पावसामुळे नागरिकांना रोजच्या कामामध्ये व्यत्यय पडतो आहे. रविवारी दुपार पासून उपराजधानी सह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू आहे. मात्र पाऊस येतो तो इतका जोरात येतोय की दाणादाण उडवून जातोय. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, माहूर, हिमायत नगर, किनवट आणि नांदेड शहर तसेच ग्रामीण भागात रात्रीपासून सतत पाऊस पडतोय. या पावसामुळे नांदेड इथली इंटरनेट सेवा खंडीत झाली आहे.
या पावसाचा सर्वाधिक त्रास हा शेतकऱ्यांना होणार आहे. पेरणीनंतर पाऊस गायब झाला होता. तो काहीसा मागील ६ दिवसांपूर्वी परतल्याने शेतकरी आनंदीत झाला. मात्र गेले तीन दिवस नागपुर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये सतत पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम खरीप पिकांवर होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. विदर्भातील काही तालुक्याचा भागात काल रात्री ६० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
अधिक वाचा : महामेट्रो को 165 करोड़ मिलने से डबल डेकर प्रोजेक्ट को मिलेगी गति