माजी क्रिक्रेटपटू आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इमरान खान यांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. शुक्रवारी संसदेत झालेल्या मतदानात त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ते आज पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत इमरान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. दोन दशकं राजकारण केल्यानंतर त्यांच्या पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे तेच पाकिस्तानचे पंतप्रधान होतील अशी शक्यता त्याच वेळी वर्तवण्यात आली होती.
Imran Khan has been elected as Pakistan’s 22nd Prime Minister in a vote at the country’s National Assembly, on Friday. ??#PrimeMinisterImranKhan #ImranKhan pic.twitter.com/wzE0S6gk9r
— Govt of Pakistan (@pid_gov) August 17, 2018
शुक्रवारी सहयोगी पक्षांच्या मदतीने या पक्षाने आपलं मताधिक्य संसदेत दाखवलं. खान यांना 176 मतं मिळाली तर पाकिस्तान मुस्लीम लीगचे उमेदवार शाहबाज शरीफ यांना 96 मतं मिळाली.
शनिवारी त्यांचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी सुनील गावस्कर, नवज्योत सिंग सिद्धू, कपिल देव यांच्यासह अनेक मान्यवरांना पाकिस्तानला निमंत्रित केलं आहे.
जर पंतप्रधान म्हणून आपली निवड झाली तर आपण आर्थिक सुधारणांवर लक्ष देऊ, असं त्यांनी सांगितलं.
अधिक वाचा : पाकिस्तान ने स्वतंत्रता दिवस से पहले 30 भारतीय कैदियों को किया रिहा