मराठा क्रांती मोर्चा : ‘सरकारला सर्व मागण्या माहिती अाहेत. त्यामुळे अाता अाम्ही चर्चेस येणार नाही, सरकारनेच तातडीने निर्णय घ्यावा,’ अशी अाक्रमक भूमिका एकीकडे ‘सकल मराठा समाज’ संघटनेने घेतलेली असताना रविवारी खासदार नारायण राणे, अामदार नितेश राणे यांच्या पुढाकारातून मराठा अांदाेलनातील एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
या शिष्टमंडळातील अाठ सदस्यांची नावे ना सरकारने जाहीर केली ना राणेंनी. सुरक्षेच्या कारणास्तव ती गाेपनीय ठेवली जात असल्याचेही सांगण्यात अाले. मात्र साेशल मीडियातून जेव्हा ही नावे बाहेर अाली तेव्हा मराठा समाजातून त्यांच्यावर माेठ्या प्रमाणावर राेष व्यक्त केला जाऊ लागला.
दरम्यान, शनिवारी झालेल्या विरोधी पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत जी अाश्वासने दिली हाेती तीच अाश्वासने फडणवीस यांनी या शिष्टमंडळाला दिली.
अाम्ही राणेंकडे गेलाे हाेताे, त्यांनीच मुख्यमंत्र्यांकडे नेले
‘खरे तर अाम्ही राणेंनाच भेटायला गेलाे. अांदाेलकांचे अटकसत्र थांबावे म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घालावे अशी अपेक्षा हाेती. मात्र राणेंनी अाम्हाला थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीलाच नेले,’ असे उस्मानाबादचे बलराज रणदिवे यांनी सांगितले.
मराठा क्रांती मोर्चाची भूमिका
- मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वयकांची लातूरमध्ये राज्यस्तरीय बैठक झाली.
- मुंबईत मुख्यमंत्री आणि राणेंबरोबर बैठकीला उपस्थित असलेल्या समन्वयकांशी संबध नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
- यापुढे संपूर्ण राज्यामध्ये कशा प्रकारचे आंदोलन करायचे याची दिशा मराठा क्रांती मोर्चा ठरवणार असल्याचे यावेळी समन्वयक म्हणाले.
- 9 ऑगस्टला क्रांतीदिनापासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचे यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
अधिक वाचा : आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार- नारायण राणे