औरंगाबाद – राज्यात सध्या मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू असतानाच एकाने त्यासाठी गोदावरी नदीत उडी मारुन जीव दिल्यानंतर मराठा आंदोलनाचा आणखी एक बळी आज गेला आहे. मंगळवारी आरक्षणाच्या मागणीसाठी विष घेतलेल्या जगन्नाथ सोनावणे याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मराठा आंदोलनाने सध्या हिंसक वळण घेतले असून राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या आंदोलकाने सोमवारी आरक्षणाच्या मागणीसाठी नदी पात्रात उडी घेत जीव दिल्यानंतर मंगळवारी जगन्नाथ सोनावणे या तरुणाने विष घेतले होते. त्याला त्यानंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. पण तेथे जगन्नाथची प्रकृती चिंताजनक होती. पण आज अखेर त्याचा मृत्यू झाला असल्यामुळे मराठा आंदोलन आता आणखीनच चिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चा : ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी