मुंबई-पुणे मार्गावर मदुराई एक्स्प्रेस चा एक डबा आज पहाटे खंडाळ्याजवळ रुळावरून घसरला. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. कोणी जखमीही झालेले नाही. मात्र मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या अपघातामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई-पुणे सिंहगड, प्रगती आणि इंटरसिटी एक्स्प्रेस, कर्जत-पुणे पॅसेंजर या गाड्यांच्या दोन्ही बाजुंच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ-पुणे एक्स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे वळवण्यात आली आहे.
अप मार्गावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक व्यवस्थित सुरु आहे. पण मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडया उशिराने धावत आहेत तसेच काही गाडया रद्द झाल्या आहेत. या अपघातामुळे मागच्या सगळया गाडयांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
या गाड्या रद्द…
-पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस
-पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
-पुणे-कर्जत व कर्जत पुणे शटल
-भुसावळ पुणे एक्स्प्रेस
-पुणे -मुंबई प्रगती एक्स्प्रेस
अपघातग्रस्त एक्स्प्रेसची बोगी कापून बाजुला काढण्यात आली असून उर्वरित गाडी पुढे रवाना करण्यात आली आहे.
अधिक वाचा : राज्यात बुलेट ट्रेन आणि नाणार प्रकल्प होऊ देणार नाही – शिवसेना आमदार गोऱ्हे