नागपूर :- भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या श्री शिव प्रतिष्ठान संगठन चे प्रमुख संभाजी भिडे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. राज्यातील समस्त जनतेला फसविणारे खोटे आश्वासन देणारे भाजप शिवसेना सरकार त्यांची पाटीराख करीत आहे.
माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलं होतात असा दावा करून समस्त मंहिलांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिड़ेला त्वरीत अटक करण्याच्या मागणी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी भिडे यांचे प्रतिकात्मक रुप घेवून त्यांच्या शेतातील आंबे त्यांना वाचविणाऱ्या भाजप सरकारला पावसाळीअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कॉग्रेस आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानभवनात दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १ जानेवारी १९२७ रोजी स्वतः भीमा कोरेगाव येथे येऊन विजय स्तंभाला मानवंदना दिली. तेव्हापासून दरवर्षी लाखो अनुयायी भीमा कोरेगावला येऊ लागले. यावर्षी २०० वर्ष पूर्ण होणार असल्याने मनुवादी समाजकंटकानी आधी छ्त्रपती संभाजी महाराजांचा अंतिम संस्कार करणाऱ्या गणपत माहारांची समाधी तोडली. तिथे आलेल्यांना पाणी, जेवण मिळणार नाही अशी व्यवस्था करीत चिमुरड्यांसह सर्वांवर अमानुष पणे दगड फेक करीत त्यांच्या गाडया जाळल्या ही दंगल पूर्वनियोजित होती.
मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे हे मुख्य आरोपी होते. एकबोटे यांना अटक झाली. पण जामीनही लगेच मिळाला. परंतु संभाजी भिडे यांना अद्याप अटक होत नाही. सरकार भिडेचे पाठीराखे आहे का ? एकीकडे आरोपीला अटक केली जात नाही. मात्र न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंबेडकरी आंदोलकांना नेस्तनाबूत करण्यासाठीच हे सर्व षडयंत्र रचले जात आहे. एल्गार परिषदेशी कुठलाही संबंध नसलेल्यांना गोवले जात आहे. संभाजी भिडे हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात.
तसेच देशातील पहिली राज्यघटना ही मनूची असल्याचे जाहिर केले आहे. हे वक्तव्ये म्हणजे भारतीय राज्यघटनेला कमी लेखून तिचा अपमाण करण्याचे देशद्रोही कृत्य होय. भिड़ेवर देशद्रोहाचा गुन्हादाखल करण्यात यावे या मागणी करीता व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी भिडे यांचे प्रतिकात्मक रुप घेवून त्यांच्या शेतातील आंबे त्यांना वाचविणाऱ्या भाजप सरकारला पावसाळीअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कॉग्रेस आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानभवनात दिला.
अधिक वाचा : विदर्भ बंद ची हाक – शेकडो कार्यकर्ते ताब्यात