नुपूर शर्माचे समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हेची निर्घृण हत्या ?

Date:

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे उदयपूरमध्ये झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. याच हत्येच्या पाच दिवस आधी अमरावतीमध्ये मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

अमरावती : अमरावती शहरातील व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांचा गळा चिरुन २१ जूनला रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. उदयपूरमधील हत्याकांडानंतर अमरावतीच्या या हत्येबाबत आता मोठे खुलासे समोर येत आहेत. अशात कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशी ‘एनआयए’ने करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली होती.

दरम्यान, याच प्रकरणाच्या चौकशीसाठी शुक्रवारी (दि. १) सकाळी ‘एनआयए’चे (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक शहरात दाखल झाले असून, त्यांनी प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नाही. सध्या उमेश कोल्हे खून प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडून सुरू असून, आतापर्यंत पाच आरोपींना अटक आहे.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांची चौकशीची मागणी…

उमेश कोल्हे यांचा खून लूटमारीसाठी झाला असल्याचे निदर्शनास येत नाही. आरोपींनी लुटण्यासाठी चाकू मारला असता तर सोबतचे सामान, पैसे ते घेऊन पळाले असते. शिवाय, या खून प्रकरणात पकडलेले आरोपी यापूर्वी कुख्यात म्हणून प्रसिद्ध नाहीत. रुपये लुटण्यासाठी उमेश कोल्हे दिसताक्षणी मोठा चायनीज चाकू त्यांच्या गळ्यात खुपसण्याऐवजी धाक दाखवून पैसे पळवण्याचा प्रयत्न झाला असता. हा खून नूपूर शर्मा प्रकरणाशी संबंधित आहे का? हे पडताळण्यासाठी ‘एनआयए’ने तपास करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...

President Of India Inaugurates National Arogya Fair 2026 At Shegaon

Ayush Systems Of Medicine Have Made An Invaluable Contribution...