राज ठाकरे म्हणाले राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद बोकाळला

Date:

मुंबई : राज ठाकरे म्हणाले राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद बोकाळला . आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात जाती- जातीचे विष पेरले जात आहे. अलीकडे जातीचा मुद्दा हा त्या त्या समाजाच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा बनला आहे. देशाला विचार देणारा महाराष्ट्र आता यूपी- बिहारच्या पातळीवर घसरत चालला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी केला.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते. राज्यातील आरक्षण व जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार ठरवत सांगितले की, कोण हा जेम्स लेन? ज्याने पुस्तक लिहले? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता काय? आता कुठे आहे तो, कोणी ओळखतंय का त्याला?. पण हे सगळे ठरवून केले गेले

अमूक जातीच्या लोकांनी लेनला चुकीचा इतिहास व माहिती सांगितल्याचा प्रचार केला गेला. आपल्या राजकीय स्वार्थासाठी असे वातावरण तयार केले जाते.

या घटना तत्कालिक असतात पण त्याचे परिणाम भयंकर आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाला कोणाचाच विरोध नव्हता तर मग आरक्षणाला कोणाचा अडथळा आहे? मराठा आरक्षणाचा शेवटी खेळच झाला, मी आधीच तसे सांगितले होते.

पण आपल्या देशात काही प्रश्न सुटणे ही समस्या मानली जाते. काही प्रश्न रेंगाळत ठेवल्याने अनेकांची घरे भरतात. जातीचे राजकारण संपल्याशिवाय आपल्याला पुढे जाता जाणार नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

ICSI Workshop in Nagpur : “Decoding Companies Act” for Compliance and Governance

Nagpur : Nagpur Chapter of ICSI organized a Workshop...

Why IT companies in Pune Hinjewadi Continues to Attract IT Companies?

Hinjewadi is the western district of Pune which has...

New IT Companies in Pune Hinjewadi: Pune’s Growing Tech Hub

Hinjewadi is the western district of Pune which has...

Happy Children’s Day 2024: Celebrate the Future, Honor the Present

  Happy Children's Day 2024: Celebrate the Future, Honor the...