टोकियो ऑलिम्पिक: भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने फ्रीस्टाइलच्या ६५ किलो वजनी गटात सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. बजरंग पुनिया याने उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या मोर्टेझा चेका घियासी याला चितपट केले.
१/८ च्या फेरीत बजरंगने किर्गिझस्तानच्या एर्नाझर अकमातलीव याचा पराभव केला होता. त्यानंतर बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या कुस्तीपटूला मात दिली.
बजरंग पुनियाकडून भारताला पदकाची आस आहे.
काल गुरुवारी (दि.६) ५७ किलो वजनी गटात भारताच्या रवी कुमार दहियाने रौफ्यपदक कामगिरी केली.
सुवर्णपदकाच्या लढतीत दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या रशियाच्या जावूर युग्युयेव्हने रवी कुमार दहिया याच्यावर ७-४ गुणांनी मात केली. अंतिम फेरीत पराभव झाला असला तरी त्याने झुंझार खेळाचे प्रदर्शन केले.
रवीने २०२० आणि २०२१ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर त्याने २०१८ च्या अंडर-२३ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले होते.