नागपूर : बळजबरी करणाऱ्या (Sexual Harassment) सावत्र वडिलांची लाकडी दांड्यानं वार करून हत्या (Daughter killed step father) केल्याची खळबळजनक घटना नागपूरात घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सावळी बेबी येथील रहिवासी असणाऱ्या मुलीला तिचा सावत्र वडील सातत्यानं बळजबरी करत होता. यामुळे पीडित मुलीनं सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून त्यांच्या तोंडावर लाकडी दांड्यानं वार करून त्यांची हत्या केली आहे. याप्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मृताची पत्नी आणि मुलीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
ज्ञानेश्वर दामाजी गडकर असं हत्या झालेल्या सावत्र वडिलांचं नाव असून ते 60 वर्षांचे होते. पंधरा वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीनं सोडून दिल्यानंतर मृत ज्ञानेश्वर यानं वंदना नावाच्या एका विवाहित महिलेशी लग्न केलं होतं. लग्नाच्या वेळी वंदनाला पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी होती. लग्न झाल्यानंतर ज्ञानेश्वर सावळी बीबी याठिकाणी वंदनासोबत राहू लागला. काही दिवस एकत्र राहिल्यानंतर ज्ञानेश्वर वर्धा जिल्ह्यातील खापरी याठिकाणी राहायला गेला. पण तो अधून मधून सावळी बीबी याठिकाणी वंदनाला भेटायला येत होता.
इथे भेटायला आल्यानंतर तो वंदनाला आणि सावत्र मुलीला नेहमी त्रास द्यायचा. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास मृत सावत्र वडील ज्ञानेश्वर नेहमी प्रमाणे दारू पिऊन आला. यावेळीही त्यानं 17 वर्षीय सावत्र मुलीवर बळजबरी करण्यास सुरुवात केली. यावेळी वंदना देखील तिथेच होत्या. पत्नीलादेखील आवरत नसल्याचं पाहून पीडित मुलीनं जवळचं पडलेल्या लाकडी दांड्यानं ज्ञानेश्वरच्या तोंडावर जबरी वार केला. या एका फटक्यात ज्ञानेश्वर बेशुद्ध पडला. यानंतर रक्तप्रवाह जास्त झाल्यानं ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला आहे.
मृत ज्ञानेश्वरला 4 तुरुंगवास झाला होता
विशेष म्हणजे, मृत ज्ञानेश्वरला चार वर्ष तुरुंगवास झाला होता. त्यानं 2016 मध्ये त्याच्या अल्पवयीन सावत्र मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी न्यायालयानं त्याला कलम 376 आणि पोक्सो कायद्यांतर्गत 4 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 15 जानेवारी 2021 मध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली होती. पण कारावास पूर्ण होण्याअगोदरचं ज्ञानेश्वर तुरुंगातूना बाहेर आला होता. तेव्हापासून मृत ज्ञानेश्वरनं या मायलेकींना त्रास द्यायला सुरू केला होता. याप्रकरणी 20 जानेवारी रोजी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.