Arijit Singh च्या आईला केले हॉस्पिटलमध्ये भरती, A- ब्‍लडची गरज

Date:

मुंबई : ख्यातनाम गायक Arijit Singh च्या आईची तब्येत बिघडली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अरिजीतच्या आईला रक्ताची आवश्यकता असल्याची माहिती अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने ट्विटरवरून दिली.

अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने गुरुवारी सकाळी १० वाजता ट्वीट केले. त्या ट्वीटमध्ये स्वस्तिकाने लिहिले की, ‘गायक Arijit Singh च्या आईची तब्येत बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोलकाता येथील ढाकुरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना ए निगेटिव्ह रक्ताची गरज आहे. तसेच हे रक्त पुरुषाचेच हवे आहे.’

वाचा: ध्रुव ताहिल अभिनेता दिलीप ताहील यांच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक

हिच माहिती स्वस्तिकाने इन्स्टाग्रामवरदेखील शेअर केली आहे. स्वस्तिकाच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अद्याप अरिजीत सिंगच्या आईच्या तब्येतीची कोणतीही ताजी माहिती मिळालेली नाही. माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला देण्यात येईल.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related