Nagpur Temperature नागपूरसह विदर्भातील तापमान आता वाढत आहे. नागपुरातील उष्णतामानाचा पारा रविवारी ४१.२ अंशावर होता, तर चंद्रपूर ४३ अंश सेल्सिअसच्या दिशेने जात आहे.
Nagpur : नागपूरसह विदर्भातील तापमान आता वाढत आहे. नागपुरातील उष्णतामानाचा पारा रविवारी ४१.२ अंशावर होता, तर चंद्रपूर ४३ अंश सेल्सिअसच्या दिशेने जात आहे. अकोलाने ४३ अंशाचा पारा गाठला आहे.
मागील चार दिवसांपासून तापमान वाढत आहे. नागपुरातील तापमान रविवारी कालच्यापेक्षा ०.३ अंश सेल्सिअसने कमी नोंदविले गेले. मात्र उष्णतामान चांगलेच होते. सकाळी शहरातील आर्द्रता २९ टक्के नोंदविली गेली, तर सायंकाळी २० टक्के नोंदविण्यात आली. वातावरणात प्रचंड शुष्कता वाढली आहे.
अकोलामध्ये सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर चंद्रपूरचेही तापमान ४३ अंशाच्या दिशेने चालले आहे. तिथे रविवारी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यासोबतच अमरावतीमध्ये ४०.६ अंश, वर्धा ४१.६, गोंदीया ४०.८, गडचिरोली ४१, तर वाशिममध्ये ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची गेल्या २४ तासात नोंद झाली आहे.