पत्नी ही काही पतीची जंगम मालमत्ता नाही. तिची इच्छा नसेल तर, आपल्या सोबत राहण्याची बळजबरी करू शकत नाही किंवा तिच्यावर कोणताही दबाव टाकू शकत नाही, असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने याचिका दाखल केलेली होती, त्यात असं म्हटलं होतं की, माझ्या पत्नीने पुन्हा माझ्यासोबत राहावे आणि दोघांनी एकत्र संसार करावा, अशी मागणी केलेली होती. त्यावेळी वरील महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
न्यायमूर्ती संजय किशन कौल, हेमंत गुप्ता या दोन सदस्यीय खंडपीठाने याचिके दरम्यान न्यायालयात याचिकाकर्त्याला सुनावलं. “तुम्हाला काय वाटतं? पत्नी ही काय एखादी वस्तू आहे का? आम्ही तिला अशाप्रकाराचा आदेश देऊ. पत्नी ही काही जगंम मालमत्ता आहे का? तुमच्या पत्नीला तुमच्या बरोबर जाण्याचा आदेश कसा काय देऊ शकतो”, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकर्त्याला विचारला.
गोरखपुरमधील कौटुंबिक न्यायालयाने हा आदेश दुसऱ्यांदा काम ठेवला म्हणून पतीने अलाहाबाद उच्च न्यायालयानेदेखील कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला म्हणून याचिकाकर्त्याने थेट सर्वोच्च न्यायालयाने गाठले. पत्नीने आपली बाजू मांडताना म्हटलं आहे की, पोटगीची रक्कम द्यावी लागू नये म्हणून हे सर्व प्रयत्न सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पतीने याचिकेमध्ये मांडलेले मुद्दे फेटाळून लावले.
पत्नीने पती परत जावं आणि त्याच्यबरोबर संसार करावा, अशी बाजू पतीच्या वकिलाने मांडली. यावर सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की, “तुम्ही इतके बेजाबदार कसे असू शकता? ते महिलेसोबत एखादी जंगम मालमत्ता असल्याप्रमाणे वागत आहे. ती काही वस्तू नाही, अशा शब्दात याचिकाकर्त्याच्या वकिलाला सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं.