नागपूर: नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि एका लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो मध्ये नेऊ शकता.
महा मेट्रो प्रशासननाने या संबंधी सुविधा नागरिकांन करिता उपलब्ध केली असून आज काही मेट्रो प्रवाश्यानी सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथून लोकमान्य नगर स्टेशन दरम्यान त्यांनी स्वतः सायकल सोबत बाळगून मेट्रोने प्रवास केला. प्रवास करतांना मेट्रो प्रवाशांनी सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथून लिफ्टच्या साहाय्याने काँनकोर्स येथे प्रवेश केला, तिकीट काउंटर येथून येथून तिकीट घेत एएफसी गेटच्या माध्यमाने स्टेशन परिसरात प्रवेश करत पुनः लिफ्टच्या साहाय्याने प्लॅटफार्म येथे पोहोचून मेट्रो ट्रेन मध्ये सायकल सोबत बाळगून गंतव्य स्थानकापर्यंत प्रवास गाठला.
प्रवासा दरम्यान मेट्रो प्रवाश्यानी सांगितले की उपलब्ध करून देण्यात आलेली सेवा आमच्या सारख्या सायकलीस्ट व वर्किंग व्यक्ती करता अत्यंत फायदेशीर असून जे नियमित पणे सायकलचा उपयोग करून दररोज ये जा करता आता सायकल मेट्रो मध्ये सोबत नेणे सोईस्कर झाले असून आमचा प्रवास देखील सायकल सोबत नेत आरामदायक झाला आहे. या सेवेचा नागरिक नक्कीच लाभ घेतील जे सायकलचा उपयोग नियमित करतात. महा मेट्रो या अनोख्या प्रवास करता प्रवाश्याना आवाहन करते कि मेट्रो प्रवासी आता कुठल्याही ठिकाणी जाण्याकरिता सहज पणे मेट्रो मध्ये सायकल सोबत बाळगून प्रवास करू शकतात. त्यामुळे आता मेट्रो सोबत सायकल अशी पर्यावरणपूरक प्रवासी सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरणार आहे.