नागपूर : काेराेना आजाराने मृत्युमुखी पडलेल्या आराेग्य सेवकांना श्रद्धांजली म्हणून १४ ऑक्टाेबर राेजी धम्मचक्र प्रवर्तन दिनी जगप्रसिद्ध दीक्षाभूमी स्तुपावर राेषणाई करण्यात आली नाही. आंबेडकरी अनुयायांनीही स्मारक समितीच्या या निर्णयाचे स्वागतच केले. मात्र येत्या २५ ऑक्टाेबरला अशाेक विजयादशमी दिनी राेषणाई करावी, अशी विनंती विविध आंबेडकरी संघटनांनी केली हाेती. धम्मदीक्षा ही बाैद्ध बांधवांसाठी अभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी तरी राेषणाई ही मागणी भिक्खु संघानेही केली. या विनंतीला मान देउन स्मारक समितीने दीक्षाभूमीवर राेषणाई करण्यास संमती दर्शवली आहे. भिक्खु संघासह समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, तथागत बहुउद्देशीय संस्था, अशोका बुद्धिस्ट मायनॉरिटी मल्टि. सोसायटी, द प्लॅटफॉर्म, युवा परिवर्तन बहुउद्देशीय संस्था, जनहित बहुउद्देशीय खादी ग्रामोद्योग संस्था, जरीपटका दलित कल्याण महिला मंडळ, विश्वशांती बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, संथागार फाऊंडेशन संस्था, नीलगगन बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागार्जुन बुद्ध विहार, मानव अधिकार संरक्षण मंच यांच्यातर्फे निवेदन सादर करण्यात आले.
२५ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी स्तूपवर लाईटिंग होणार आहे
Date: