नागपूर : सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिह्यात ९८२ नवे संक्रमित रुग्ण आढळले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे आता एकूण संक्रमितांची संख्या ७८,०१२ झाली आहे, तर मृत्यूने २,५१० चा आकडा गाठला आहे.
बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ७२२ तर ग्रामीणमधील २५८ रुग्णांचा समावेश आहे. यात जिह्याबाहेरील दोन व्यक्तींचा अंतर्भाव आहे. मृतांमध्ये शहरातील २६ आणि ग्रामीणमधील १०, तर जिल्ह्याबाहेरील २ व्यक्तींचा समावेश आहे. एकूण संक्रमितांमध्ये शहरातील ६१,९६६, ग्रामीणमधील १५,६१९ तर जिल्ह्याबाहेरील ४२७ रुग्णांचा समावेश आहे. एकूण मृतांमध्ये शहरातील १,८२५, ग्रामीणमधील ४४० आणि जिल्ह्याबाहेरील २४५ रुग्णांचा समावेश आहे.
मागील २४तासात ६,६७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ५,२२४, ग्रामीणमधील १,४५३ नमुने तपासण्यात आले. ३,३८१ नमुन्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली तर ३,२६९ नमुन्यांची अॅन्टिजेन टेस्ट केली गेली.
आजवर एकूण ४,५१,६३९ नमुने तपासण्यात आले आहेत. बुधवारी झालेल्या ३,२६९ अॅन्टिजेन टेस्टमध्ये २३१ नमूने पॉझिटिव्ह आले. खासगी लॅबमध्ये २६९ नमुने पॉझिटिव्ह आले. याशिवाय एम्सच्या लॅबमध्ये १०९, मेडिकलच्या लॅबमध्ये ९७, मेयोच्या लॅबमध्ये १५०, माफसूच्या लॅबमध्ये ५८, तर नीरीच्या लॅबमध्ये ४१ नमुने पॉझिटिव्ह आले.
१,३५२ रुग्ण झाले दुरुस्त
नागपूर जिल्ह्यात बुधवारी १,३५२ संक्रमित रुग्ण दुरुस्त होऊन घरी परतले आहेत. यात शहरातील १,०२०, ग्रामीण मधील ३३२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६२,४६७ संक्रमित दुरुस्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत १३,०३५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
अॅक्टिव्ह १३,०३५
दुरुस्त ६२,४६७
मृत २,५१०