नागपूर : शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे, या दृष्टीने महापालिकेतर्फे नवीन १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या नवीन केंद्रासह नागपूर शहरात आता कोरोना चाचणी केंद्रांची संख्या ५० झाली आहे.
शहरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि रोजचा मृत्यूदर रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या सर्व ५० चाचणी केंद्रांवर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेमध्ये काही ठिकाणी ‘आरटीपीसीआर’ आणि ‘अँटीजेन’ चाचणी केली जात आहे. ‘अँटीजेन’ चाचणीचा अहवाल ३० मिनिटांमध्ये माहित होतो. मात्र ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल येण्यासाठी कालावधी लागतो. ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल लवकर मिळावा यासाठीही मनपाद्वारे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
शहरात सध्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीची ६ केंद्र असून लवकरच या केंद्रांचीही संख्या वाढविली जाणार आहे. सध्या नागपूर शहरात दररोज साधारणत: ४००० चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या वाढवून दररोज ५ हजार चाचण्या करण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांची लोक प्रतिनिधींसोबत बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये कोरोनाच्या चाचणीची संख्या वाढविण्याची सूचना करण्यात आल्या होत्या.
कोरोना चाचणी पॉझीटिव्ह असेल आणि लक्षणे असतील तर रुग्णालयात दाखल होण्यासाठी आणि कुठल्या रुग्णालयात बेड्सची उपलब्धता आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर ०७१२ – २५६७०२१ या क्रमांकावर संपर्क करावा. कोरोना संदर्भातील इतर मार्गदर्शनासाठी ०७१२-२५५१८६६, ०७१२-२५३२४७४, टोल फ्री नं. १८००२३३३७६४ या क्रमांकावर संपर्क करावे.
– झोन निहाय नवीन कोरोना चाचणी केंद्र
आरटीपीसीआर चाचणी केंद्र
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केंद्र (आरपीटीएस)
धरमपेठ झोन अंतर्गत लॉ कॉलेज वसतिगृह, रविभवन, मॉरिस कॉलेज वसतिगृह
आसीनगर झोन अंतर्गत पाचपावली पोलीस वसाहत
मंगळवारी झोन अंतर्गर प्रभाग क्रमांक १० राजनगर
अँटीजन चाचणी केंद्र
लक्ष्मीनगर झोन : जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र, सोमलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र
धरमपेठ झोन : के.टी.नगर प्राथमिक आरोग्य केंद्र, फुटाळा, तेलंगखेडी, हजारीपहाड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इंदिरा गांधी रुग्णालय, डिक दवाखाना आणि बुटी दवाखाना.
हनुमाननगर : हुडकेश्वर आणि नरसाळा प्राथमिक आरोग्य केदं्र , मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र
धंतोली झोन : कॉटन मार्केट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयसोलेशन दवाखाना, बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र
नेहरूनगर झोन : नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र, दिघोरी हेल्थपोस्ट, बिडीपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मोठा ताजबाग
गांधीबाग : मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र आमि नेताजी दवाखाना, डाग्नेटिक सेंटर महाल प्राथमिक आरोग्य केंद्र, भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, दाजी दवाखाना.
सतरंजीपुरा झोन : मेहंदीबाग प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बिनाको फिमेल दवाखाना, जागनाथ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, शांतीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सतरंजीपुरा दवाखाना.
लकडगंज झोन : चकोले दवाखाना, डिप्टी सिंग्नल आणि आदिवासी मुलांचे वसतिगृह प्राथमिक आरोग्य केंद्र
आशीनगर झोन : कपिलनगर आणि शेंडेनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, गरीब नवाजनगर, कुंदनलाल गुप्तानगर, बंदे नवाजनगर
मंगळवारी झोन : नारा प्राथमिक आरोग्य कें द्र आणि जरीपटका दवाखाना, इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, झिंगाबाई टाकळी आणि गोरोवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, सदर रोगनिदान केंद्र.