सॅमसंगच्या स्मार्टफोनसोबत चार्जर मिळणार नाही

Date:

सॅमसंगच्या एका निर्णयामुळे ग्राहकांना जास्तच धक्का बसणार आहे. या स्मार्टफोनसोबत मिळणारा चार्जर न देण्याचा निर्णय देण्याबद्दल सॅमसंगकडून विचार सुरू आहे. त्यामुळे सॅमसंगच्या नव्या मोबाईल सोबत चार्जर न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सॅममोबाईलनं दिलेल्या वृत्तानुसार पुढील वर्षापासून काही स्मार्टफोनसोबत चार्जर न देण्याची योजना सॅमसंगकडून आखली जात आहे. सॅमसंगनं असा निर्णय घेतल्यास पहिल्यांदाच कंपनीचे फोन चार्जरशिवाय विकले जातील. त्यामागील विचार पूर्णपणे आर्थिक असल्याचं बोललं जात आहे. सॅमसंग जगातील सर्वात मोठ्या स्मार्ट फोन निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी दरवर्षी कोट्यवधी फोन्सची विक्री करते. या फोन सोबत चार्जर न दिल्यास कंपनीला आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे फोनचे किंमत कमी होईल त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांनाही होणारच आहे असा विचार कंपनीकडून सुरू आहे.
सध्या जगभरात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सचे चार्जिंग पोर्ट्स जवळपास सारखेच असतात. सगळ्याच कंपन्या यूएसबी-सी पोर्ट चार्जिंग पोर्ट्सचे फोन तयार करतात. सॅमसंग याच मुद्द्याचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. चार्जरशिवाय फोन शिकण्याच्या विचारात असलेली सॅमसंग ही पहिली कंपनी नाही. ऍपलकडूनही आयफोन १२ ची सीरिज चार्जरशिवाय बाजारात लॉन्च करण्याबद्दल विचार सुरू आहे.

फोन सोबत चार्जर न दिल्याने ग्राहकांची एकीकडे निराशा होणार असली, तरी त्यामुळे फोनचे किंमत कमी होणार असल्यानं ग्राहकांना दिलासाही मिळणार आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related