मुंबई. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला 13 दिवस उलटून गेले आहेत. तेराव्या दिवशी त्याच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सुशांतला अखेरचा निरोप देण्यासोबतच ब-याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
निवेदनात लिहिले आहे की, ‘गुडबाय सुशांत. आपल्यासाठी सुशांत सिंह राजपूत, पण आमच्यासाठी आमचा लाडका गुलशन (सुशांतचे टोपणनाव) होता. तो मनमोकळा, गपिष्ट आणि विचारशील मनाचा होता. तो सर्व काही जाणून घेण्यास खूप उत्सुक असायचा. तो स्वप्नं बघायच्या आणि स्वप्नांना प्रत्यक्षात रुपांतर करण्याची क्षमता त्यात होती. तो कुटुंबाचा अभिमान आणि प्रेरणा होता.
त्याचे टेलिस्कोप त्याच्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट होती. त्यातून तो ता-यांचे निरीक्षण करायचा. आता त्याचे हसू पुन्हा ऐकू येणार नाही, ही गोष्ट आम्ही स्वीकारु शकत नाहीये. त्याचे चमकणारे डोळे यापुढे कधीही दिसणार नाहीत. आम्हाला विज्ञानाशी संबंधित कधीही न संपणा-या गोष्टी ऐकायला मिळणार नाहीत. त्याच्या जाण्याने कुटुंबामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली जी कधीही भरली जाणार नाही. तो त्याच्या प्रत्येक चाहत्यावर प्रेम करायचा.
आमच्या गुलशनवर खूप प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. त्याच्या आठवणी आणि वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने आता आमचे कुटुंब सुशांत सिंह राजपूत फाउंडेशनची स्थापना करणार आहे ज्याच्या माध्यमातून चित्रपट, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील तरुण प्रतिभेला संधी दिली जाईल. पाटण्यातील राजीव नगरमधील त्याचे घर आता स्मारकात रूपांतरित होणार आहे. आम्ही त्याचे वैयक्तिक सामान जसे की पुस्तके, दुर्बिणी, फ्लाइट सिम्युलेटर तिथे ठेवू जेणेकरून त्यांचे चाहते ते बघू शकतील.
आता आम्ही त्याचे इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक पेज एक संस्मरणीय अकाऊंट म्हणून चालवू, ज्याद्वारे त्याच्या आठवणी कायमचे जिवंत राहतील. आम्ही तुमच्या प्रार्थनांसाठी आभारी आहोत. – सुशांतचे कुटुंबीय
14 जून रोजी झाले निधन: सुशांतने 14 जून रोजी सकाळी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. 15 जून रोजी त्यांच्यावर मुंबईत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटण्यात त्याचे अस्थी विसर्जन करण्यात आले.