नागपूर : नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासांत बुधवारी १४ ने वाढ झाली आहे. नागपुरातील करोनाबाधित रूग्णांची संख्या आता ३०० वरून ३१४ वर गेली आहे. नव्याने आढळलेल्या १४ रूग्णामध्ये ६ गर्भवती महिलांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नागपुरात सर्वाधीक रूग्ण सतरंजीपुरा आणि मोमिनपुरा या दोन परिसरातून आहे. नागपुरात ६ मार्चला कोरोनाचा पहिला रूग्ण सापडल्यानंतर २४ एप्रिलला ४८ दिवसांत कोरोनाबाधित रूग्णांची शंभरी झाली होती. त्यानंतर ६ मे रोजी १२ दिवसानंतर नागपुरात कोरोनाच्या रूग्णांचे दुसरे शतक नोंदविले. तर त्यानंतर आता काल मंगळवारी १२ मे रोजी अवघ्या ६ दिवसात नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा शंभरच्या पार पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोरील चिंता आणखी अधिक वाढल्या आहेत. नागपुरातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूर नजीक राधाकृष्ण सस्तंग ब्यास यांच्या जागेत ५ हजार क्षमतेचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.
Also Read- अमरावती जिल्ह्यात २४ रुग्ण कोरोनामुक्त