नागपूर, ता. ७ : लॉकडाऊनमध्ये शहराशहरात अडकलेल्या परप्रांतीय मजूर आणि अन्य व्यक्तींना स्वगृही परतण्यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. प्रवासापूर्वी त्यांच्याकडे शासनाने प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असावे, अशी अट घातली होती. मात्र ही अट आता शासनाने एका नव्या आदेशातून रद्द केली आहे.
स्वगृही परतणाऱ्या मजूर आणि अन्य व्यक्तींना आता स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी खेटे मारावे लागणार नाही. प्रशासनाकडून आलेल्या यादीनुसार जे मजूर ज्यावेळी प्रवास करतील, त्या प्रवासापूर्वी त्यांचे डिजीटल थर्मामीटर आणि अन्य चाचण्यांच्या माध्यमातून स्क्रिनींग करण्यात येईल. शासकीय वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे ही तपासणी मोफत करण्यात येईल. तपासणीनंतर ज्या प्रवाशांमध्ये ताप अथवा कुठलाही आजार नाही अशा प्रवाशांची केवळ एक यादी देण्यात येईल. त्यामुळे स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नसल्यामुळे ही अटच रद्द करण्यात करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
Also Read- लग्नाआधीच नवरीच्या आई-वडिलांचं निधन, नातेवाईक न आल्यानं पोलिसांनी केलं कन्यादान