नागपूर: सतरंजीपुरा परिसरातील करोनाची वाढती लागण लक्षात घेता, प्रशासनाने एका विशिष्ट भागातील ११६ हून अधिक लोकांना ताब्यात घेतले असून, वानाडोंगरी परिसरातील शासकीय वास्तूत त्यांचे विलगीकरण केले आहे. त्यास त्या भागातील लोकांनी विरोध केला आहे.
नागपुरातील पुन्हा एक रुग्ण कोरोनामुक्त
सतरंजीपुरा येथील एक व्यक्ती मृत पावल्यानंतर तो करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या संपर्कात आलेल्या पन्नासाहून अधिक जणांना करोनाने ग्रासले. सतरंजीपुरा परिसरातील करोनाबाधितांचा आकडा ५७पर्यंत पोहोचल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दुपारपर्यंत त्या मृत व्यक्तीच्या घराच्या आसपास राहणाऱ्या लोकांचे विलगीकरण सुरू केले. अनेकांनी त्यांना विरोध केला. काहींनी वेळ मागितली. ११६हून अधिक लोकांना वानाडोंगरीला हलविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेने मात्र हे जवळपास १५० लोक असल्याचे म्हटले आहे.
रहिवाशांचा विरोध
करोनाबाधितांच्या वस्तीतील लोकांना वानाडोंगरी येथे आणताच, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, सुचिता ठाकरे यांनी त्यास विरोध केला. राष्ट्रवादीचे नेते रमेश बंग यांनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधून ‘हा दाट वस्तीचा भाग आहे, औद्योगिक क्षेत्र आहे. कामगार राहतात त्यामुळे सतरंजीपुरा येथील लोकांच्या विलगीकरणासाठी तातडीने वेगळी जागा शोधावी’, अशी विनंती केली.
आमदार निवासात २४५
नागपुरात आता विलगीकरण करण्यासाठी प्रशासनाने सहा ठिकाणी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. यात आमदार निवास, रविभवन, सिम्बायोसिस, वनामती, लोणारा आणि वानाडोंगरी येथील वसतिगृह यांचा समावेश आहे. आमदार निवास येथे २४५ जणांचे विलगीकरण करण्यात आले असून, २५ खोल्या उपलब्ध आहेत. रविभवन येथे दोन, सिम्बायोसिस येथे दोन व अन्य अशा एकूण ४० खोल्या उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कुठे किती?
आमदार निवास : २४५
रविभवन : ६९
सिम्बायोसिस : ७०
वनामती : ९८
लोणारा : ३१
वानाडोंगरी : ११६
Also Read- Maharashtra Records 778 New Covid-19 Cases, Toll of Infections Now up to 6,427