बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात गृह विलगीकरणामध्ये असलेल्या 70 नागरिकांनी आपला 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केला आहे. यामुळे त्यांची यातून मुक्तता करण्यात आली आहे. असं असलं तरी गृह विलगीकरणात सोमवारी 30 रुग्णांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत गृह विलगीकरणात 93 नागरिक आहेत. संस्थात्मक विलगीकरणात एकूण 80 जण होते ज्यातील 30 नागरिकांना सोमवारी सुटी देण्यात आली. मात्र दुसरीकडे यात संस्थात्मक विलगीकरणात सोमवारी 3 नागरिकांची वाढ झाली. ज्यामुळे हा आकडा आता 53 झाला आहे.
बुलडाण्यातील अलगीकरण कक्षात 28 मार्च रोजी मृत पावलेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात 4 जण आले होते. यामुळे त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. याला आता 14 दिवस पूर्ण होत असून त्यांचे नमुने सोमवारी प्रयोगशाळेत पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. चाचणीचा अहवाल हा आज प्राप्त होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आयसोलेशन कक्षात सोमवारी एकही संशयित दाखल करण्यात आलेला नाही. सद्यस्थितीत खामगांव आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 1, बुलडाण्यात 18 व शेगांव येथे 12 व्यक्ती दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 31 व्यक्ती अलगीकरणात आहेत. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 145 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरणातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर सोमवारपर्यंत 162 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले आहे. अलगीकरणातून सोमवारी एकालाही सुटी देण्यात आली नाही.
Also Read- अजमेर येथून आलेला वाडीतील एक पॉझिटिव्ह