अमेरिकेत एक आठवड्यापूर्वी केवळ ८ हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु, आता अमेरिकेने चीनलादेखील मागे टाकले आहे. आतापर्यंत जगात २४ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासात अमेरिकेत १६ हजार लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता तेथील एकूण संख्या ८५ हजार झाली आहे.
तीन मोठ्या देशांची तुलना केल्यास तेथील कोरोनाने संक्रमित लोकांची संख्या पाहिल्यास अमेरिकेला सर्वांत मोठा दणका बसला आहे. अमेरिकेत ८५ हजार ०८८ जणांना लागण झाली आहे. चीनमध्ये ८१ हजार २८५ जणांना लागण झाली आहे. इटलीमध्ये ८० हजार ५८९ जणांना लागण झाली आहे.
अमेरिकेत मागील २४ तासात २६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात अमेरिकेत कोरोनाने मृत्यू झालेला ही सर्वात मोठी संख्या आहे. याप्रकारे अमेरिकेत गुरुवारपर्यंत एकूण १ हजार २९० लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जवळपास २ हजार लोकांची परिस्थिती गंभीर बनली आहे.
चीनमध्ये आतापर्यंत ३ हजार, २८७ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये कोरोनाने आचापर्यंत ८ हजार २१५ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कन्फर्म केसची संख्या चीनपेक्षा अधिक असल्याच्या मुद्द्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हे कुणालाही माहिती नाही की, चीनमध्ये किती संख्या आहे. मी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करेन.
Also Read- नागपुरात आणखी नवीन पाच कोरोनाग्रस्त – एकून संख्या ९ वर