नागपुरकरांचा मेट्रो प्रवास आणखी सुखकर होणार

Date:

नागपूर: नागपुरकरांचा मेट्रो प्रवास आणखी सुखकर होणार

नागपूर सीताबर्डी ते लोकमान्यनगर या अॅक्वा लाइनवरही आता १४ मार्चपासून दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू होणार आहे. अर्ध्या तासाच्या अंतराने या मार्गावर सध्या मेट्रो धावत आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता या मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ केली असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

नागपूर मेट्रो: अप आणि डाऊन मार्गावर फेऱ्या वाढणार

अॅक्वा लाईनवर २८ जानेवारीपासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करीत आता १४ मार्च २०२० पासून दर १५ मिनिटांनी मेट्रो ट्रेन प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. या आधी फक्त ऑरेंज लाईन मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू होती.

नागपूर मेट्रोचे जाळे विस्तारणार

दिवसाला एकूण २०० फेऱ्या

सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. नागरिकांना दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सर्व नियोजन महामेट्रोतर्फे करण्यात आले आहे. अॅक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर ऑरेंज आणि अॅक्वा लाईन दोन्ही मिळून दर रोज २०० मेट्रोच्या प्रवासी फेऱ्या कार्यरत राहणार आहेत. ११.५ किमीच्या अॅक्वा लाइनवर लोकमान्य नगर, वासुदेव नगर, सुभाष नगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स, झाशी राणी आणि सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन असे एकूण ६ स्टेशन सध्या कार्यरत आहेत. या मार्गावर शैक्षणिक संस्था अधिक असल्याने विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद आहे. महा कार्डने मेट्रोचे तिकीट खरेदी केल्यास सर्वच प्रवासी दरांवर १० टक्क्याने सवलत मिळणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

Also Read- कोरोना’संदर्भात मनपाची आरोग्य सुविधा ‘अलर्ट’ आपात्कालीन क्रमांक

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related