नागपूर- नागरिकता कायद्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अशात केंद्र सरकारने मंगळवारी २०२१च्या जनगणनेची घोषणा केली. त्याचा अधिकृत अर्ज आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे. यंदा तंत्रज्ञानाच्या मदतीने जनगणना करण्यात येणार आहे. त्यात अनेक प्रश्नांची नागरिकांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. नागरिकांनी खरी उत्तरे दिल्यास त्या आधारावर सरकार विविध घटकांसाठी नव्या योजना तयार करणार आहे.
खराब पाणी कुठे जाते? जनगणनेच्या प्रश्नांमध्ये ‘घरातील खराब पाणी कुठे जाते? नालीत, रस्त्यावर की मोकळ्या मैदानामध्ये’, याचेही उत्तर नागरिकांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे किती वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा आहेत, याचीही माहिती सरकारला मिळणार आहे.
अर्ज पाहायचाय?
भारतीय जनगणना विभागाने अधिकृत अर्ज इंटरनेटवरील आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आहे. http://www.censusindia.gov.in यावर जाऊन हा अर्ज नागरिकांना पाहता येईल. त्यात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. दोन पानांचा हा अर्ज आहे. मागील जनगणना २०११ मध्ये करण्यात आली होती. नव्या जनगणनेसाठी एप्रिल २०२० पासून काम सुरू होणार आहे.
याची द्यावी लागणार उत्तरे…
– भवनाची संख्या
– घराचा क्रमांक
– घराचे छत, फरशी, भिंती कशाच्या आहेत.
– त्यांच्या निर्माणासाठी माती, टाइल्स, मार्बल काय वापरले आहे.
– घराच्या भिंती कच्च्या आहेत की पक्क्या.
– भिंती कशापासून उभारण्यात आल्या आहेत.
– एकूण परिवाराची संख्या
– कुटुंबातील प्रमुखाचे नाव
– घर कुणाच्या नावाने आहे.
– परिवारात एकूण किती सदस्य राहतात.
– पिण्याचे पाणी कुठून येते.
– घरातील विजेचा प्रमुख स्रोत काय आहे.
– घरात पक्के शौचालय आहे का.
– घरातील सांडपाणी कुठे जाते
– परिसराची स्वच्छता होते काय.
– घराच्या परिसरात स्नानासाठी व्यवस्था आहे का.
– घरात गॅस सिलिंडर आहे का.
– स्वयंपाक करण्यासाठी कोणती चूल वापरली जाते.
– रेडिओ, मोबाइल, स्मार्टफोन्सची संख्या.
– घरात टीव्ही, कूलर, एसींची संख्या.
– डीश अॅन्टिना, फ्रीज वैगरे उपकरणे.
– इंटरनेटने घर जोडले गेले आहे का.
– लॅपटॉप, संगणक, सीसीटीव्ही आहेत का.
– सायकल, दुचाकी, चारचाकी आहे का.
– कार, जीप कोणते वाहन आहे
– किती जण बँकिंग सेवा वापरतात. कशा प्रकारे
– मोबाइल नंबर आणि फोटो