नागपूर: लोकमान्यनगर ते सीताबर्डी या मेट्रो मार्गाचे लोकार्पण येत्या ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लोकार्पणानंतर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असून, लोकमान्यनगर ते सीताबर्डी ११ किमीचे मेट्रोने गाठण्यासाठी २० रुपये तिकीट दर लागणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
७ सप्टेंबरनंतर प्रवाशांसाठी हा मार्ग सुरू करण्यात येणार आहे. लोकमान्यनगर ते सीताबर्डी हा ११ किमी आणि खापरी ते सीताबर्डी १३.८ किमी असा मेट्रोचा २५ किमीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे. लोकार्पणानंतर सर्वसामान्यांना मेट्रोने प्रवास केव्हा करायला मिळणार, याबाबत उत्सुकता लागली आहे. ही उत्सकता आता लवकच संपणार असून, अवघ्या २० रुपयांत लोकमान्यनगर ते सीताबर्डी हा प्रवास करता येणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
तिकीट दर:
लोकमान्यनगर ते सुभाषनगर : १० रुपये
लोकमान्यनगर ते इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअर्स : २० रुपये
लोकमान्यनगर ते सीताबर्डी : २० रुपये
लोकमान्यनगर ते एअरपोर्ट : ३० रुपये
लोकमान्यनगर ते एअरपोर्ट साउथ : ३० रुपये
लोकमान्यनगर ते न्यू एअरपोर्ट : ३० रुपये
लोकमान्यनगर ते खापरी : ३० रुपये
…अशी धावेल मेट्रो
लोकमान्यनगर : सकाळी ८.१० वाजता (दर तासाने उपलब्ध- रात्री ८.१० पर्यंत)
सुभाषनगर : सकाळी ८.२८ वाजता (दर तासाने उपलब्ध- रात्री ८.२८ पर्यंत)
इन्सिटट्युट ऑफ इंजिनीअर : ८.४२ वाजता (दर तासाने उपलब्ध- रात्री ८.४२ पर्यंत)
सीताबर्डी : ८.४८ वाजता (दर तासाने उपलब्ध- रात्री ८.४८ पर्यंत)