एक छोटा मुलगा झपाटून जातो… सतत खिचिकचा शोध घेऊ लागतो. पण हे खिचिक काय रहस्य आहे, असा प्रश्न “खिचिक” या चित्रपटाच्या ट्रेलरमधून निर्माण झाला आहे. या चित्रपटाचा रंगतदार ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला.
कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर पराग जांभुळे, अमितकुमार बिडला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रीतम एसके पाटील यांनी या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. योगेश कोळीनं छायांकन, अमित मलकानी आणि रोहन पाटीलनं संकलन, अभिषेक-दत्तानं संगीत दिग्दर्शन, ध्वनी आरेखन राशी बुट्टे , नितीन बोरकरनं कला दिग्दर्शन, विजय गवंडेनं पार्श्वसंगीत केलं आहे.सचिन दुबाले पाटील हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटात सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, पॉला मॅक्ग्लिन, सुदेश बेरी, अनिल धकाते, शिल्पा ठाकरे, रसिका चव्हाण बालकलाकार यश खोंड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ट्रेलर पाहून खिचिक हा चित्रपट एका शोधावर आधारित असल्याचा आपल्याला अंदाज बांधता येतो. पण या शोधालाही अनेक कंगोरे आहेत. ते काय आहेत आणि चित्रपटाची कथा कुठे कुठे घेऊन जाते याची उत्तरं चित्रपटातूनच मिळतील. मात्र मनोरंजक संवाद, दमदार अभिनय असलेल्या खिचिक विषयी उत्सुकता निर्माण झालीय हे निश्चित!
येत्या २० सप्टेंबरला हा “खिचिक” चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.