नागपूर : हनुमाननगर झोन आजपासुन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्षेत्रीय कार्यालय या नावाने ओळखला जाईल. सन २०१९-२० चा अर्थसंकल्प मनपा सभागृहाला सादर करतांना स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने सभागृहाचे मंजूरीनंतर आज नगरीच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली, दक्षिण नागपूर चे आमदार श्री.सुधाकर कोहळे व हनुमाननगर झोन सभापती माधुरी प्रविण ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत औपचारीकरित्या नामकरण करण्यात आले.
दक्षिण नागपूर मतदार संघाचे मा.आमदार श्री.सुधाकर कोहळे व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या निवेदनाप्रमाणे हा प्रस्ताव म.न.पा. सभागृहाने पारित करुन “वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्षेत्रीय कार्यालय (हनुमाननगर) झोन क्र.०३” असे नामकरण करण्यात आले आहे.
या प्रसंगी नगरसेवक सर्वश्री. भगवान मेंढे, डॉ.रविंद्र भोयर, सतीश होले, अभय गोटेकर, दिपक चौधरी, नागेश मानकर, राजेन्द्र सोनकुसरे, नगरसेविका सर्व श्रीमती स्वाती आखतकर, उषाताई पॅलट, शीतल कामडे, कल्पना कुंभलकर, रुपाली ठाकुर, मंगला खेकरे, लीलाताई हाथीबेड, विद्या मडावी, सहा.आयुक्त राजेश भिवगडे, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, उप अभियंता कृष्णकुमार हेडाऊ, सहा. अधिक्षक विकास रायबोले व अधिकारी कर्मचारी व गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : अंगणवाडी केंद्रातील पोषण आहारात वटवाघुळाचे मृत पिल्लू