नागपूर : नवी दिल्ली – केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना जोरदार झटका दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या (GPF) व्याजदरात कपात केली आहे. १० बेसिस पॉइंटची कपात केल्यानंतर या फंडातील जमा रकमेवर ८ टक्क्यांऐवजी ७.९ टक्के व्याज मिळणार आहे. नवीन व्याजदर १ जुलैपासून लागू झाले आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जीपीएफवरील व्याजदरात कपात करण्यात येत असल्याची माहिती दिली. जीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात १० बेसिस पॉइंटची कपात केली आहे. १ जुलैपासून ७.९ टक्के व्याज मिळणार आहे, असं अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. गेल्या तीन तिमाहीपासून या फंडावर ८ टक्के व्याज मिळत होता.
‘या’ कर्मचाऱ्यांना कपातीचा फटका
> जनरल प्रॉव्हिडंट फंड (सेंट्रल सर्व्हिसेस)
> कॉन्ट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड (इंडिया)
> स्टेट रेल्वे प्रॉव्हिडंट फंड
> इंडियन ऑर्डनन्स डिपार्टमेंट प्रॉव्हिडंट फंड
> इंडियन ऑर्डनन्स फॅक्ट्रीज वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड
> जनरल प्रॉव्हिडंट फंड (डिफेन्स सर्व्हिसेस)
> डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड
> आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रॉव्हिडंट फंड
> इंडियन नेव्हल डॉकयार्ड वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड
अधिक वाचा : नवोदय अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी अशोक धवड यांना उच्च न्यायालयाचा दणका, जामीन नाकारला